अयोध्येत रामलल्लाचा सूर्य तिलक ; अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूरसह देशभरात रामनवमीचा उत्साह..

अयोध्या : देशभरात रविवारी रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूर, कोलकातासह देशातील विविध शहरांमध्ये सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामनवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. तर अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले होते.

अयोध्या : देशभरात रविवारी रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूर, कोलकातासह देशातील विविध शहरांमध्ये सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामनवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. तर अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले होते.

अयोध्येत रामनवमीला दुपारी ठीक १२ वाजता रामलल्लाचा सूर्य तिलक झाला. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचा हा दुसरा सूर्य तिलक आहे. अभिजित मुहूर्तावर दुपारी १२ वाजता रामलल्लाच्या सूर्य तिलकदरम्यान, त्यांच्या कपाळावर ४ मिनिटे किरणे पडली. त्यानंतर मंदिरात आरती झाली. सूर्य तिलकच्या आधी रामलल्लाचे दरवाजे काही काळ बंद होते. सूर्य तिलक स्पष्टपणे दिसावा म्हणून गर्भगृहातील दिवे बंद करण्यात आले होते. सूर्य तिलकसाठी अष्टधातु पाईप्सपासून एक प्रणाली बनवण्यात आली. यामध्ये, ४ लेन्स आणि ४ आरशांमधून गर्भगृहातील रामलल्लाच्या मस्तकावर किरणे पाठवण्यात आली.

पंचामृताने स्नान केल्यानंतर रामलल्लाचा शृंगार करण्यात आला. रामनवमीला रामलल्लाने रत्नजडित मुकुट घातला होता. हिरा-माणिक तिलक लावून सजवण्यात आले होते. शाही हार, हिऱ्यांनी जडवलेल्या बांगड्या, दोन पेंडेंट असलेला सोनेरी पट्टा, पिवळे कपडे, सोनेरी कानातले, माणिक-मोत्याचा हार, रत्नजडित हार, लाल अंगवस्त्रम, पायात चांदीचे पायघोळ आणि सोनेरी धनुष्यबाण धारण केले.

संभलमध्ये पहिल्यांदाच भगवी मिरवणूक

उत्तर प्रदेशातील संभल जिल्हा गेल्या काही काळापासून जातीय हिंसाचार आणि मशिदीच्या वादामुळे चर्चेत आहे. याच संभलमध्ये रामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे पहिल्यांदाच भव्य भगवी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संपूर्ण शहरासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. यामध्ये परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला.

बंगालमध्ये हिंदू संघटनांची मिरवणूक 

रामनवमीनिमित्त आज पश्चिम बंगालच्या विविध भागांतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हिंदू संघटना आणि भाजपचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रामनवमीच्या निमित्ताने बंगालमध्ये अनेक दिवसांपासून प्रचंड राजकारण सुरू आहे. यामुळेच राज्यात विविध ठिकाणी कडोकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात होता.

इक्बाल अन्सारी यांनी दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा…

बाबरी मशीद समर्थक इक्बाल अन्सारी यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी भक्तांवर पुष्पवृष्टी केली. म्हणाले की अयोध्या ही धर्म आणि देव-देवतांची भूमी आहे. अयोध्येत शतकानुशतके रामनवमी साजरी केली जात आहे. आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुता आहे आणि आम्ही ‘गंगा-जमुनी तहजीब’चा आदर करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »