समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने  आयशरचा अपघात; एकजण ठार 

जालना : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर शुक्रवार,  11 एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास आयशर आणि एका वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. आयशर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सुत्रांनी दिली.  

जालना : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर शुक्रवार,  11 एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास आयशर आणि एका वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. आयशर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सुत्रांनी दिली.  

     समृद्धी महामार्गावर जामवाडी शिवारात हा भीषण अपघात झाला. या ठिकाणी ड्युटीवर असलेले   पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस अमलदार गवई महामार्ग पोलीस केंद्र जालना व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तात्काळ घटनास्थळी जाऊन पहाणी केली. आयशर ( एम एच 12 एलटी 6062 )  चा चालक झोपेची डुलकी लागल्यामुळे समोरच्या अज्ञात वाहनास धडकून केबिनमध्ये दबला. यात जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.  गुलाब काळू आडे ( 50, रा  हलवीरा तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी ) असे मयताचे नाव आहे. तर अपघातग्रस्त वाहनाच्या पाठीमागून दुसरा आयशर (  एम एच 40  सी एम 4474  )  चा चालक अमित रामदास मिश्रा (  रा. सुलतानपूर उत्तर प्रदेश )  समोरच्या अपघात वाहनास वाचवण्याच्या प्रयत्नात  वाहन पलटी झाले. यात कोणीही जखमी झाले नाही.  दोन्हीही वाहन हे छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जात होते.  मयत गुलाब आडे याचा मृतदेह वाहनातील केबिन  मधून समृद्धी महामार्गावरील आर पी व्ही टीमच्या मदतीने कटरने कापून  बाहेर काढण्यात आला.  त्यानंतर  त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवण्यात आले.  अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन करून वाहतूक  सुरळीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »