जळगाव जामोद : जळगाव जामोद भागातील राजुरा शिवारामध्ये शिरच्छेद झालेल्या तसेच अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृत्यूचे कारण बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने उकलले असून मध्यप्रदेशातील वडील आणि भावानेच माहेरी आलेल्या मुलीची हत्या करून तिचे प्रेत जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आणून टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही पिता पुत्रांना ताब्यात घेतले आहे.

राजुरा शिवारामध्ये आसिफ हमीद मुल्लाजी यांच्या शेताच्या धुऱ्याजवळ नदीकाठावर शिरच्छेद होऊन अर्धवट जळालेल्या स्थितीत एका महिलेचे मृतदेह आढळून आल्याची घटना 26 एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असल्यामुळे मध्य प्रदेश सीमालगत भागातील पोलीस स्टेशनमध्ये महिलेच्या बेपत्ता झाल्याची माहिती मिळविली असता एक मे रोजी बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार पोस्टे मध्ये बापूराम नथ्थू कलमेकर (50) यांनी त्यांची मुलगी शिवानी प्रकाश भिलावेकर रा. खार्या टेंभुर तालुका धारणी जिल्हा अमरावती हे घरी कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याची फिर्याद दिल्याचे समोर आले होते. यावरून बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घटने प्रकरणी बापूराव नथ्थू कलमेकर व त्यांचा मुलगा अजय बापूराम कलमेकर (27) दोघे राहणार खडकी तालुका खकणार जिल्हा बुऱ्हानपूर यांना ताब्यात घेतले तसेच दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता वडील बापूराम नथ्थू कलमेकर यांनी मुलीचे चुलत भावासोबत प्रेम संबंध असल्याने व ती लग्न होऊन सुद्धा ऐकत नसल्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यात बांबूने वार करून तिला जीवे ठार मारले व मुलगा अजय कलमेकर यांच्या मदतीने तिचा मूर्त देह जळगाव जामोद तालुक्यातील राजोरा शिवारामध्ये आणून टाकल्याचे कबुली दिली. तसेच मृताची ओळख पटू नये म्हणून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी उपरोक्त दोघांविरुद्ध कोणाचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करीत आहे.