dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा; पेपरफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.

देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात ४२ तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र ३ मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.

पेपरफुटीचे ‘नाशिक कनेक्शन’

पेपरफुटीचे केंद्र नाशिक असल्याचे सांगितले जात असताना मंगळवारी राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांनी इंदिरानगर भागातून एकाला ताब्यात घेतले. आपली ओळख पटू नये म्हणून संशयिताने वेशभूषा बदललेली होती. केस कापलेले होते. संशयित मूळचा नाशिकचा असून तो भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

१० लाखात मिळवली प्रश्नपत्रिका

नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी आर्थिक देवाण घेवाण देखील झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हा पेपर १० लाख रुपयात मिळवण्यात आला पुढे तो १५ लाख रुपयात विकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या संशयित आरोपीने १० लाख रूपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती पुढे १५ लाखात विकल्याची माहिती मिळत आहे. यानंतर प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रम आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top