dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वरूणराजाच्या साक्षीने दुमदुमली धाकटी पंढरी..! लाखो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर :    छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शनिवार, 25 जुलै रोजी लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गद केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती. “विठ्ठल… विठ्ठल…“ आणि “ज्ञानोबा-तुकाराम“ यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विशेष म्हणजे दुपारी वरूनराजाने हजेरी लावल्याने वारकरी बांधवांनी या आषाढी एकादशीच्या शुभसोहळ्याचा आनंत आनंद घेतला. 

छत्रपती संभाजीनगर :    छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शनिवार, 25 जुलै रोजी लाखो भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गद केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची रांग लागली होती. “विठ्ठल… विठ्ठल…“ आणि “ज्ञानोबा-तुकाराम“ यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विशेष म्हणजे दुपारी वरूनराजाने हजेरी लावल्याने वारकरी बांधवांनी या आषाढी एकादशीच्या शुभसोहळ्याचा आनंत आनंद घेतला. 

जिल्ह्यासह परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. अनेक दिंड्या, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि अभंग-भजनांच्या सुरावटीत मंदिरात पोहोचल्या. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. महिलांसह ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलांनीही दर्शनाचा लाभ घेतला.

भाविकांची मोठी गद लक्षात घेऊन मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत, स्वच्छता आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पवित्र स्थळी दरवष आषाढी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदाही लाखो भक्तांच्या उपस्थितीने धाकटी पंढरी अक्षरशः दुमदुमून गेली आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

देवगिरी बँकेच्या कर्मचाऱ्यांची पर्यावरणपूरक वारी 

देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देणारी अनोखी वारी काढत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. छत्रपती संभाजीनगर ते छोटे पंढरपूर या मार्गावर कर्मचाऱ्यांनी एकसमान गणवेश परिधान करून रस्त्यालगत पडलेला कचरा संकलित करत स्वच्छता अभियान राबविले. या पर्यावरणपूरक वारीमध्ये महिला व पुरुष कर्मचारी, बँकेचे संचालक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वारीदरम्यान बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी अभंग गात कर्मचाऱ्यांसोबत कचरा उचलत स्वच्छतेचा संदेश दिला. कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण मार्गावर स्वच्छता मोहीम सुरू ठेवली.

खिचडी प्रसादाचे आयोजन

भारतीय जनता पाट राजस्थान प्रकोष्ठ व महिला प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांची महाआरती तसेच भाविकांसाठी खिचडी प्रसाद वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, शहर जिलाध्यक्ष किशोर शितोळे, उद्योगपती विवेक देशपांडे, माजी जिलाध्यक्ष शिरीष बोराळकर, मंडल अध्यक्ष सचिन गुगले, नगरसेवक किशोर मानकापे, उत्तर भारतीय आघाडीचे सुनील उपाध्याय यांच्यासह प्रकोष्ठाचे संजय मंत्री, अभिषेक फयाल, सोमनाथ तांबी, जगदीश जांगिड, नंदकिशोर मालपाणी तसेच महिला प्रकोष्ठाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top