dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सर्व मागण्‍या मान्‍य; कॉकरोज जनता पार्टीचे आंदोलन मागे

नवी दिल्ली : धमेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा, तसेच अन्‍य प्रमुख दोन मागण्‍या मान्‍य झाल्‍यानंतर २५ जुलै रोजी सायंकाळी कॉकरोज जनता पार्टीने दिल्‍लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेले आंदोलन तत्‍काळ प्रभावाने मागे घेतलल्‍याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारसोबतच्या चर्चेनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले, कॉकरोच जनता पार्टी जाहीर करते की, ठरलेल्या अटींची अंमलबजावणी निश्चित वेळेत केली जाईल या समजुतीसह आम्ही सद्भावनेने हे आंदोलन मागे घेत आहोत.

शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा ; आंदोलकांवरील सर्व खटले मागे घेणे ; नीट पीडितांना नुकसान भरपाई

नवी दिल्ली : धमेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा, तसेच अन्‍य प्रमुख दोन मागण्‍या मान्‍य झाल्‍यानंतर २५ जुलै रोजी सायंकाळी कॉकरोज जनता पार्टीने दिल्‍लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेले आंदोलन तत्‍काळ प्रभावाने मागे घेतलल्‍याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारसोबतच्या चर्चेनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले, कॉकरोच जनता पार्टी जाहीर करते की, ठरलेल्या अटींची अंमलबजावणी निश्चित वेळेत केली जाईल या समजुतीसह आम्ही सद्भावनेने हे आंदोलन मागे घेत आहोत.

गेल्या काही दिवसांत सरकारसोबत तीन फेऱ्यांची चर्चा झाली. त्यांच्या तिन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सर्व खटले मागे घेणे आणि नीट पीडितांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई. सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे मुख्य प्रवक्ते सौरव दास म्हणाले, केवळ दिल्लीतच नव्हे, तर भाजपशासित आणि भाजप-मित्रपक्ष सत्तेत असलेल्या सर्व राज्यांमध्ये आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर मागे घेतले जावेत, ही आमची दुसरी मागणी होती. सरकारने ती मागणीही मान्य केली आहे. शिवाय, हे एफआयआर लवकरच मागे घेतले जातील. दाखल केलेल्या सर्व एफआयआरच्या प्रती (आमच्याकडील ताज्या माहितीनुसार दिल्लीत १५ ते २० एफआयआर दाखल झाले होते) सरकार आम्हाला देईल आणि त्या प्रती आम्हाला कोणत्याही परिस्थितीत तीन ते चार दिवसांत मिळतील, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. 

शिक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे सुपुर्द केला राजीनामा 

देशभरात सुरु असलेल्या नीट पेपर फुटीविरोधातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना दोन पानी पत्राद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, गेल्या १० दिवसांतील घटनांमुळे मी व्यथित झालो आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. मी देशाच्या युवाशक्तीला कोणत्याही दुष्टचक्रात अडकू देणार नाही. हा माझा निर्धार आहे.

“कॉकरोच जिंकले..लोकशाही जिंकली”

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) प्रतिक्रिया दिली आहे. ‘कॉकरोच जिंकले, लोकशाही जिंकली’ असे सांगणारे एक निवेदन पक्षाने प्रसिद्ध केले आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा पक्ष गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तिथे उपोषण केले होते.

हा लोकशाहीचा विजय : वांगचुक

सोनम वांगचुक म्हणाले, हा लोकशाहीचा, प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे. रस्त्यांवरील लोकांचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे. सीजेपी आणि जेन-झेडचे अभिनंदन. देशाच्या कानाकोपऱ्यातून उठून उभ्या राहिलेल्या सर्व नागरिकांचे आभार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top