dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी सुरेश देवकर दमदार नेतृत्व : सौरभ खेडेकर

अकोला : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी योग्य प्रतिनिधीत्वाची गरज असते. त्यासाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुरेश देवकर हे दमदार नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्र हे देशाच्या आणि युवकांच्या प्रगतीचे व विकासाचे मोठे उगमस्थान आहे, असे प्रतिपादन सौरभ खेडेकर यांनी केले.

अकोला : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी योग्य प्रतिनिधीत्वाची गरज असते. त्यासाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुरेश देवकर हे दमदार नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्र हे देशाच्या आणि युवकांच्या प्रगतीचे व विकासाचे मोठे उगमस्थान आहे, असे प्रतिपादन सौरभ खेडेकर यांनी केले.

सुरेश देवकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी अकोल्यातील ज्योती जानोरकर विद्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या प्रचारसभेत शिक्षक मतदार बांधवांशी संवाद साधण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित करत सुरेश देवकर यांच्या प्रचाराला यावेळी प्राधान्य देण्यात आले. सभेला उपस्थित शिक्षक बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरेश देवकर यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी संस्था सचिव प्राचार्य प्रशांत जानोळकर, सुभाष कोल्हे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके, नप/मनपा शिक्षक संघाचे राज्य संघटक शे. अनवर आणि संभाजी ब्रिगेडचे ऋषभ काळे उपस्थित होते. सभेचे संचालन गजानन काळे यांनी केले, तर दीपक गायकवाड यांनी आभार मानले.

देवकर यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश

सुभाष कोल्हे यांनी आपल्या मनोगतातून सुरेश देवकर यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य, सामाजिक प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका तसेच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षणातील समस्यांसाठी योग्य प्रतिनिधी आवश्यक : प्राचार्य प्रशांत जानोळकर

देश सध्या शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांमधून जात आहे. या समस्यांच्या निराकरणासाठी शिक्षकांनी योग्य व्यक्तीला विधान परिषदेत पाठविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य प्रशांत जानोळकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top