नवी दिल्ली ; देशातील लोकशाही नष्ट केली जात आहे. हा संघर्ष म्हणजे केवळ अनेक स्वतंत्र लढायांची मालिका नसून ती एकच संयुक्त चळवळ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांचा राजीनामा मिळवणे हेच ध्येय आहे आणि त्यासाठी आंदोलनाचा लढा सुरूच राहील, असे लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले.

नवी दिल्ली ; देशातील लोकशाही नष्ट केली जात आहे. हा संघर्ष म्हणजे केवळ अनेक स्वतंत्र लढायांची मालिका नसून ती एकच संयुक्त चळवळ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांचा राजीनामा मिळवणे हेच ध्येय आहे आणि त्यासाठी आंदोलनाचा लढा सुरूच राहील, असे लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले.
दिल्लीतील राहुल गांधींच्या निवासस्थानी १३ ऑक्टोबर रोजी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. राहुल गांधींनी विरोधी पक्षांचे नेते आणि विद्यार्थी संघटनांना चहापानासाठी व चर्चेसाठी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. ज्ञानेश कुमार आणि एसआयआर यांच्या विरोधातील आंदोलन पुढे नेण्याच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी करत, विरोधी पक्षांनी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, विरोधी पक्षाचा लढा सुरूच राहील आणि ध्येय साध्य होईपर्यंत तो अविरतपणे चालू राहील. यासाठी एक दिवस, काही दिवस किंवा अगदी दोन वर्षे लागली तरीही त्यांची टीम थांबणार नाही.
इंडिया आघाडीसोबत आम्ही ताकदीने उभे राहणार : सुप्रिया सुळे
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इंडिया आघाडीसोबत आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला वाचवण्यासाठी हे आंदोलन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सुरू राहील.
हा भारतीयांच्या भविष्याचा प्रश्न
राहुल गांधी म्हणाले, मी जनतेला वचन देतो की, ज्या लोकांनी हे केले आहे, त्यांना न्यायाच्या कचाट्यात आणले जाईल. तुम्ही येथे उभ्या असलेल्या राजकीय पक्षाची नव्हे, तर भारताच्या लोकांची अभिव्यक्ती पाहत आहात. जे काही केले जात आहे, त्याविरोधात आमच्यासोबत उभे राहिलेल्या दिल्लीच्या लोकांचे, भारताच्या लोकांचे आम्ही आभार मानू इच्छितो. हा आमच्याबद्दलचा प्रश्न नाही, हा भारताच्या लोकांबद्दलचा प्रश्न आहे. हा भारताच्या लोकांच्या भविष्याबद्दलचा प्रश्न आहे. आपण सर्वजण मिळून या देशात लोकशाही प्रक्रिया पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत. कारण आपले आपल्या देशावर प्रेम आहे आणि आम्ही तुमचा आदर करतो, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.


