dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जुनी पेन्शनच शिक्षकांचा कळीचा मुद्दा; शिक्षक भारतीकडून अपेक्षा : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक

बुलढाणा :  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिक्षकांचे अनेक प्रश्न कळीचे मुद्दे ठरत आहेत. त्यात ‘एकच मिशन; शिक्षकांच्या हक्काची जुनी पेन्शन’ हा शिक्षकांसाठी अत्यंत संवेदनशील मुद्दा ठरला आहे. जो की प्रत्येक निवडणुकीत राहतो, पण प्रश्न सुटत नाही. परंतु आता शिक्षक भारती संघटनेकडून शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे शिक्षक भारती संघटनेकडून शिक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

ब्रम्हानंद जाधव/बुलढाणा :  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिक्षकांचे अनेक प्रश्न कळीचे मुद्दे ठरत आहेत. त्यात ‘एकच मिशन; शिक्षकांच्या हक्काची जुनी पेन्शन’ हा शिक्षकांसाठी अत्यंत संवेदनशील मुद्दा ठरला आहे. जो की प्रत्येक निवडणुकीत राहतो, पण प्रश्न सुटत नाही. परंतु आता शिक्षक भारती संघटनेकडून शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे शिक्षक भारती संघटनेकडून शिक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न आता उजेडात आले आहेत. त्यात शिक्षकांच्या हक्कासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी जुनी पेन्शन योजना हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शिक्षकांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुरेश देवकर यांनी ठाम निर्धार केला आहे. कारण हा प्रश्न यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही प्रत्येकाच्या संकल्प पत्रामध्ये राहिलेला आहे. परंतु आजपर्यंत त्यावर तोडगा निघाला नाही. १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी लढा उभारण्याचे काम शिक्षक भारती संघटनेने हाती घेतल्याचे दिसते. माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षकांच्या हक्कासाठी अनेक प्रकारचे प्रश्न शासन दरबारी मांडून शिक्षकांना त्यांचे हक्क आणि न्याय देण्याचे काम केले आहे. ज्यामुळे शिक्षकांचे अनेक प्रश्न सुटू शकले. त्याचप्रमाणे जुनी पेन्शनचा मुद्दाही शिक्षक भारतीकडून मार्गी लागेल, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्‍त केल्या जात आहे.

विधान परिषद मौन का झाली?

विधान परिषदेत सात शिक्षक आमदार आहेत. परंतु शिक्षकांचे प्रश्न पाहिजे त्या प्रमाणात मांडले जात नाही. गत सहा वर्षात तर विधान परिषद मौन झाल्याचा आरोप शिक्षकांमधून होत आहे. मग शिक्षक आमदार शिक्षकांच्या प्रश्नावर गप्प का? विधान परिषदेत आवाज उठला असता तर आज शिक्षकांच्या प्रश्नांची लांबलचक यादीच तयार झाली नसती. माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी अमरावती मतदारसंघात आता लक्ष केंद्रीत केले आहे. विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘शिक्षक भारती’ शिक्षकांचा प्रभावी आवाज ठरेल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top