वैजापूर : तालुक्यातील शिऊर बंगला येथील नऊ ते दहा दुकानांना आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना सोमवार, 11 मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

वैजापूर : तालुक्यातील शिऊर बंगला येथील नऊ ते दहा दुकानांना आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना सोमवार, 11 मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत जवळपास 40 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर ते येवला रोडवरील शिऊर बंगला येथील एका पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या नऊ ते दहा दुकानांना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करीत सर्वच दुकानांना आपल्या कावेत घेतले होते. दुकानांना आग लागल्याचा प्रकार लक्षात आल्यावर स्थानिक नागरिकांनी याची माहिती शिवूर पोलिसांना दिली. शिवूर पोलिस ठाण्याचे राहुल थोरात यांनी या घटनेची माहिती वैजापूर नगर परिषदेला आणि छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, अग्निशमन केंद्र अधिकारी एल. पी. कोल्हे, अग्निशामक जवान विजय कोथिंमीरे, अक्षय नागरे, महेंद्र खोतकर, संग्राम मोरे, जगदीश गायकवाड, यंत्र चालक योगेश दुधे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.


