विनोद काळे / जालना : परतूर येथील शिक्षकांच्या आयकराच्या रक्कमेवर डल्ला मारल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. 1 कोटी 34 लाखांच्या अपहार प्रकरणात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र नारायण लोखंडे या तरूणाने थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांना लिहून पाठवले. शुक्रवार, 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून स्वतः चे रक्त काढून लोखंडे यांनी हे पत्र लिहिले.

जालना जिल्ह्यातील परतूर येथील शिक्षण विभागात 1 कोटी 34 लाख रुपयाचा अपहार झाल्याची घटना मागील आठवड्यात समोर आली. शिक्षकांच्या आयकर भरणा असलेल्या खात्यातून ही रक्कम शालार्थ समन्वयकाने स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली होती. यानंतर नारायण लोखंडे याने जिल्हा परिषद कार्यालयात गळ्यात मागण्यांचे बॅनर घालून अनोखे आंदोलन केले होते. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी समन्वयक आणि गट शिक्षणाधिकारी यांना निलंबित केले होते. याशिवाय
गुन्हे दाखल करण्याचेह आदेश शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांना दिले होते. मात्र अद्यापही गुन्हे दाखल झालेले नाही. याला जबाबदार शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ आहे. आयुक्त आणि सिईओ यांनी आदेश देऊनही शिक्षणाधिकाऱ्यांनी याच शिक्षकांना शालार्थ पदावंर् कायम ठेवले व यंत्रणेकडून भ्रष्टाचार करून घेतला. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नारायण लोखंडे या तरुणाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे रक्ताने पत्र लिहून ही मागणी केली.