dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई पॅटर्न लागू ; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा 

मुंबई : आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी 20 मार्च रोजी सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. 

राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी विधान परिषदेत प्रश्नावर लेखी उत्तर देताना दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी हे उत्तर दिले आहे. यानुसार राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून 1 एप्रिल पासून नवीन सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विषयीच्या चर्चेला उत्तर मिळाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top