dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाण्यात बिबट्याने पाडला तीन वासरांचा फडशा 

बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात तीन वासरे ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी  उघडकीस आली.  येथील क्रीडा संकुलला लागून असलेल्या रामलक्ष्मी नगरातील एका शेतातील गोठ्यात  बिबट्याने  हल्ला 

बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात तीन वासरे ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी  उघडकीस आली.  येथील क्रीडा संकुलला लागून असलेल्या रामलक्ष्मी नगरातील एका शेतातील गोठ्यात  बिबट्याने  हल्ला 

  शेतकरी   दुर्गादास काळे हे सकाळी  जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. एक महिना वय असलेले दोन व दोन महिन्याचे एक अशी  तीन वासरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. घटनेची माहिती मिळताच, क्रीडा संकुल परिसरात फेरफटका मारणाऱ्या पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर,  वन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती दिल्यानंतर तब्बल एका तासाने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top