dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वारकरी संप्रदायावर शोककळा; महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांचे निधन

सावंगी अवघडराव येथील पाताळेश्वर मंदिराचे मठपती काळाच्या पडद्याआड; निवासस्थानी मृतावस्थेत आढळले

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील पुरातन पाताळेश्वर मंदिराचे मठपती तथा प्रसिद्ध कीर्तनकार महंत ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी (वय ४९) यांचे रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भोकरदनसह जालना आणि बुलढाणा जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

कार्तिक मासानिमित्त पाताळेश्वर मंदिरात काकड आरती सुरू आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे काकड आरतीसाठी महंत देवेंद्र चैतन्य स्वामी उपस्थित न राहिल्याने भाविकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पाहणी केली. यावेळी ते मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती तत्काळ पारध पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ, पोलिस अंमलदार प्रकाश सिनकर, संतोष जाधव यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्वामींना उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच वाजता सावंगी अवघडराव येथे नातेवाईक, भाविक आणि वारकरी संप्रदायातील अनुयायांच्या उपस्थितीत महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एक परिचित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top