श्रीराम नवमीनिमित्त संत नगरी शेगावात भविकांचा भक्तिरंग; हजारो श्री भक्तांनी घेतले गजाननाचे दर्शन, श्रींचे सेवेत 869 दिंड्यांनी सहभाग

ज्ञानेश्वर ताकोते/ शेगाव – विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगावात हजारो भक्तांचा भक्तिरंग दिसून आला. श्रीराम नवमी निमित्त आयोजित सोहळ्याला राज्यासह जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावून श्रीं चे दर्शन घेतले.

ज्ञानेश्वर ताकोते/ शेगाव – विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगावात हजारो भक्तांचा भक्तिरंग दिसून आला. श्रीराम नवमी निमित्त आयोजित सोहळ्याला राज्यासह जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावून श्रीं चे दर्शन घेतले.

श्री संस्थेद्वारा 131 वा श्रीरामनवमी उत्सव 30 मार्च ते 6 एप्रील पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या उत्सवात दररोज सकाळी 6.00 ते 6.55 काकड़ा, 7.15 ते 1.15 गाया भजन, दुपारी 45 प्रवचन, सायंकाळी 5.15 ते 6.00 हरिपाठ व रात्री 8 से 10 श्रीहरी कीर्तन संपक्ष झाले. सप्ताहात ह.भ.प. भाऊनाव बुवा सुभिर, श्री क्षेत्र मुक्ताईनगर, ह.भ.प. ज्ञानेश्वर बुवा काकडे, हावरगांव, ह.म.प. पोपट बुवा फरकाडे, छ. संभाजीनगर, ह.भ.प. बळीराम बुवा दौंड, शिवर, ह.भ.प. ज्ञानेश्वर बुवा बेलादारवाडीकर, बेलदारवाडी, ह.भ.प. सोपान बुवा सानप (शास्त्री), हिंगोली, ह.भ.प. भणीज्य युवा काळे, नाशिक, ह.भ.प. श्रीराम बुवा ठाकुर, लातुर वांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. तसेच श्री अध्यात्म रामायण स्वाहाकारात चैत्र शु. 5 ला प्रारंभ होवून चैत्र शु. 1 ला सकाळी 10 वाजता यानाची पुर्णाहुती झाली. दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सवाचे श्रीहरी कीर्तन होवून नामस्मरणाचे जय जयकारात, टाळ, मृदंग, लगारा व मंगलवाद्याचे गजरात श्रीरामजन्मोत्सव संपन्न झाला.

श्रींचे सेवेत 869 दिंड्यांनी सहभाग

यावर्षी श्रीरामनवमी उत्सवांत श्रींचे सेवेत 869 दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण 10 जविन क्रियांना 10 टाळ, 1 विगा, 1 मुदंण, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाया. श्री एकनाथी भागवत असे संत वाड्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या, जुन्या दिंड्धांना भजनी साहित्य दुरूस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजनाप्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल वेव करण्यात आली.

दिड लाखांचे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण

तसेच उत्सवकाळात श्री शेगावसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओमकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्री रामनवमी उत्सव संपन्न होऊन 1,50,000 चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अशारितीने श्रीकृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे, असे श्री संस्थान तर्फे कळविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »