dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रेयसीच्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर प्रियकराकडून  अत्याचार:कदीम जालना पोलिसांनी  आवळल्या प्रियकराच्या मुसक्या

जालना  एका वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचाराबरोबरच अनैसर्गिक कृत्ये केल्याची खळबळजनक घटना जुना जालना भागात घडली. आरोपी नराधमाच्या कदीम जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

 

जालना : एका वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचाराबरोबरच अनैसर्गिक कृत्ये केल्याची खळबळजनक घटना जुना जालना भागात घडली. आरोपी नराधमाच्या कदीम जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक 28 वर्षीय महिला पतीपासून विभक्त झालेली असून ती जुना जालना भागात खोली किरायाने घेऊन राहते.

 तिला पहिल्या पतीपासून तीन मुली व एक मुलगा झालेला असून त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी पतिकडे जिंतूर येथे राहतात. तर एक 6 व दुसरी 4 वर्षाची मुलगी त्या महिलेकडे राहत आहे.

ही महिला साफसफाई आणि घरगुती काम करून तिचा व मुलींचा उदरनिर्वाह भागवते. दोन वर्षांपूर्वी तिची एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याशी ओळख झाली होती. तेंव्हापासून ती महिला आणि वाडेकर हे दोघे दोन वर्षांपासून किरायाच्या खोलीमध्ये एकत्रच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ही महिला दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कामानिमित्त घराबाहेर असते. वाडेकर हा दिवसभर घरी राहून रात्री 7.30 वाजेनंतर हॉटेलमध्ये ड्युटीवर जातो.

 शनिवार, 5 एप्रिल रोजी प्रशांत  वाडेकर याने त्याची प्रेयसी असलेली महिला घरी नसतांना 6 वर्षीय मुलीवर आधी अनैसर्गिक कृत्ये केले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

 या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चिमुकलीला खूप ताप आला होता. मोठ्या प्रमाणात उलट्याही होत होत्या. वाडेकर ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यापूर्वीही वाडेकर याने त्या चिमुकल्या बालिकेसोबत असे घाणेरडे प्रकार केल्याचे तिने आईला सांगितले. यानंतर  महिलेने  कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

 पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे यांनी तातडीने आरोपी प्रशांत वाडेकर याला ताब्यात घेतले.

 दरम्यान, हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top