dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भंते यश यांच्या संकल्पनेतील बुध्द विहारासाठी जाधव दांम्पत्याचे 21 हजाराचे धम्मदान

बुलढाणा : श्रीलंका येथील भंते यश गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथे ॲड. दिनेश गवई यांच्या ‘वनश्री’ येथील बंगल्यात स्थापित धम्मकुटीत वास्तव्यास आहेत. तेथून ते बुध्द उपासक, उपासिकांना नित्य नियमाने धम्मदेसना करीत आहेत. बुलढाणा येथे बुध्दविहार स्थापनेचा त्यांचा संकल्प आहे. त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास जावा या हेतूने पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी मुलगा डॉ.योगेश व स्नूषा डॉ. श्रवंती यांच्या मंगल परिणय वाढदिवसा निमित्त 5 एप्रील रोजी सपत्निक 21 हजार रूपयांचे धम्मदान भंते यश यांच्या सुपूर्द केले.

यावेळी बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंग राजपूत व वैशाली राजपूत, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी शिवाजीराव गवई, सुनिताताई शिवाजी गवई, लॅार्ड बुध्दाचे जिल्हा प्रतिनिधी  दिपक मोरे, ललिता मोरे, सेवानिवृत्त कमिश्नर दयानंद मिसाळ, रिपाइं आठवले गटाच्या विदर्भ महिला आघाडी उपाध्यक्षा आशा वानखडे, सेवानिवृत्त बॅंक मॅनेजर विजय गजभिये, एएसआय गंगाताई सुरडकर(ढवळे), सेवानिवृत्त एटीआय आत्माराम चौतमोल, गणेश झोटे, प्रल्हाद कांबळे, वरिष्ठ लिपीक विनोबा पाटील, लक्ष्मी बंड आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top