छत्रपती संभाजीनगर : नागपूरकडे जात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर 25 जण जखमी झाले. अपघाताची ही घटना शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील केंब्रिज चौकाच्या पुढे घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पुणे येथून प्रवासी घेऊन छत्रपती संभाजी नगर मार्गे नागपूरकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस शनिवारी पहाटे संभाजी नगर शहरात दाखल झाली. शहरातील प्रवासी उतरल्यानंतर ही बस पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नागपूरकडे जात असताना केंब्रिज चौकाच्या पुढे भरधाव बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात बसमधील एका प्रवासाचा जागीच मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या मदतीने बचाव कार्यास सुरुवात केली. पोलिसांनी जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढून त्यांना खाजगी रुग्णवाहिका व इतर वाहनातून उपचारासाठी चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वृत्त देईपर्यंत अपघातात ठार झालेल्या प्रवाशाचे नाव समजू न शकल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.