dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

इंदुरीकर महाराजांचे आज शिवकिर्तन..

बुलढाणा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत व मराठी मनाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा, बुलढाणा आज शुक्रवार १४ फेब्रुवारी सायंकाळी ४.३० वाजता रोजी आपल्या विनोदी शैलीने प्रबोधन करणारे महाराष्ट्रातील गाजलेले कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या जाहीर शिवकीर्तनाने आरंभ होणार आहे. 

या कार्यक्रमात व्यासपीठाच्या डाव्या बाजूने म्हणजे टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मागच्या मैदानात, संगम चौकाकडून जो रस्ता जिजामाता प्रेक्षागारामध्ये जातो.. त्याच बाजूला महिलांची व मुलींची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर पुरुषांची व्यवस्था व्यासपीठाचे उजव्या बाजूने अर्थात गॅरेज लाईनच्या बाजूने करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने बुलढाणा शहरात प्रथमच महाराष्ट्रातील गाजलेले विनोदी कीर्तनकार हभप.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर शिवकीर्तन शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत “शिवनेरी” जिजामाता प्रेक्षागार परिसर, आयडीबीआय बँक चौक बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहे.

तरी या शिवकीर्तनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, हे विनम्र शिवआवाहन “आम्ही शिवप्रेमी” समस्त बुलढाणेकर व आयोजक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव  समिती, बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top