छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा एमआयडीसीतील ट्रक टर्मिनल्ससाठी आरक्षित भूखंड सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या नावे घेतल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपामुळे आपली जनमानसात प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करीत मंत्री शिरसाट यांनी जलील यांच्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्यावर २४ जून रोजी सुनावणी होणार असल्याचे त्यांचे वकील अॅड. राजेश काळे यांनी सांगितले.

शिरसाट यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे की, ते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत.
चौथ्यांदा आमदार बनले आहेत. माजी खा. सय्यद इम्तियाज जलील यांनी ५ जून रोजी पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी मद्य कारखान्यासाठी मुलाच्या नावे शेंद्रा एमआयडीसीचा भूखंड घेतला. सत्तेचा गैरवापर करीत आरक्षण बदलून त्यांनी हा भूखंड घेतल्याचा आरोप केला. वास्तविक या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात आपण कोणताही पत्रव्यवहार केला नाही. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांना फोन कॉलही केला नाही. जलील यांच्या आरोपामुळे आपली प्रतिमा मलिन झाली. त्यांनी अॅड. राजेश रतनलाल काळे यांच्यामार्फत जलील यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक ३ यांच्या न्यायालयात भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (१), (२), (३) आणि जुना अब्रुनुकसानीचा कायदा कलम ५०० नुसार फौजदारी खटला दाखल केला. हा खटला १९ जून रोजी सुनावणीसाठी आला होता. मात्र नियमित न्यायाधीश सुटीवर असल्याने या खटल्याची पुढील सुनावणी २४ जून रोजी आहे.