जालना : मराठवाडा साहित्य परिषद जालना शाखेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली असून अध्यक्षपदी रवींद्र तौर, उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके, ॲड. विलास भुतेकर, सचिव पंडित तडेगावकर यांची निवड करण्यात आली.

जालना : मराठवाडा साहित्य परिषद जालना शाखेची नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली असून अध्यक्षपदी रवींद्र तौर, उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके, ॲड. विलास भुतेकर, सचिव पंडित तडेगावकर यांची निवड करण्यात आली.
आगामी कार्यकारिणी निवडीसाठी रविवार, 6 जुलै रोजी आजीव सभासदांची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. यावेळी मसाप केंद्रीय कार्यकारिणी संचालक डॉ. संजीवनी तडेगावकर, सुभाष कोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांनी कार्यकारिणीची बिनविरोध निवड घोषित केली. सहसचिवपदी बाळासाहेब तनपुरे, डॉ. ज्योती धर्माधिकारी, कोषाध्यक्षपदी डॉ. शशिकांत पाटील यांची निवड झाली आहे.
नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
कार्यकारिणी सदस्य म्हणून शिवाजी कायंदे, ॲड. सतीश तवरावाला, लक्ष्मीकांत दाभाडकर, राजाराम जाधव, शांतीलाल बनसोडे, श्रीकांत गायकवाड, प्रा.भगवंत ठाले, प्रा. मुकुंद कुलकर्णी, डॉ. शोभा यशवंते, रमाकांत कुलकर्णी, प्रा. रंगनाथ खेडेकर, प्रा. सुधाकर जाधव, डॉ. राजक्रांती वलसे, डॉ. संदीप पाटील, डॉ. गजानन जाधव, डॉ. यशवंत सोनुने, प्रा. राम कदम, डॉ. पंडित रानमाळ, कैलास भाले , कविता नरवडे, प्रा .जयश्री वाढेकर,
निमंत्रित सदस्य : डॉ. संजीवनी तडेगावकर, सुभाष कोळकर, प्रा. रमेश भुतेकर,
सल्लागार समिती : रेखा बैजल, ॲड.विनायक चिटणीस, सी. ए. गोविंद प्रसाद मुंदडा, गुलाब पाटील, विमल आगलावे, राम गायकवाड, विनीत साहनी, शिवकुमार बैजल, डॉ. सुनंदा तिडके, प्रा. राम अग्रवाल, आर .आर.खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे, प्रा. बसवराज कोरे, प्रा. रावसाहेब ढवळे, डॉ. शिवाजी मदन, प्रा. नारायण बोराडे, एस. एन. कुलकर्णी, डॉ. जगन्नाथ खंडागळे, ॲड. शिवाजी आदमाने, डॉ. संजय लाखे, राजेंद्र राख, राजेश राऊत, राम सावंत, डॉ. उध्दव थोरवे,अशोक तारडे, इंजि. रवींद्र हुशे, ज्ञानेश्वर कदम, प्रा. विलास भुतेकर, प्रभा जाधव, प्रकाश कुंडलकर यांचा समावेश आहे. बैठकीस आजीव सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.