पैठण : हातऊसने घेतलेले पैसे परत देण्याच्या कारणावरुन चार जणांनी शिवीागाळ करुन अपमानित झालेल्या दिपक्रांती प्रकाश पोटफोडे (38 वर्ष), रा.नाथनगर, ता. पैठण या युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पाच जणांविरुध्द ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याचे चार साथीदार फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जिरे असे पोलिसांनी अटक केले आहे. तर गोरख लिंबोरे, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, आबेद पठाण, कृष्णा पंडूरे, अशी फरार आरोपींची नावे आहेत. दिपक्रांती पोटफोडे यांनी गोरख लिंबोरे यांच्याकडून पाच हजार रुपये हातऊसने घेतले होते. परंतु त्यांना पैसे देण्यास विलंब झाल्याने गोरख लिंबोरे, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, आबेद पठाण, कृष्णा पंडूरे, आकाश जिरे यांनी 20 जून रोजी दिपक्रांती पोटफोडे यांच्या घरी जावून त्यांना पैशासाठी जातीवाचक शिवीगाळ करुन अपमानीत केले होते. या घटनेनंतर 21 जून रोजी दिपक्रांती पोटफोडे यांनी राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी मयत दिपक्रांती पोटफोडे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन गोरख लिंबोरे, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, आबेद पठाण, कृष्णा पंडूरे, आकाश जिरे यांच्याविरुध्द पैठण पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, दिपक्रांती पोटफोडे यांच्या आत्महत्येनंतर गोरख लिंबोरे, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, आबेद पठाण, कृष्णा पंडूरे, आकाश जिरे हे पाचही आरोपी फरार झाले होते. पैठण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आकाश जिरे याच्या मुसक्या आवळल्या. तर फरार असलेल्या इतर चार आरोपींचा पैठण पोलिस शोध घेत असल्याची माहिती उपिवभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी दिली.