छत्रपती संभाजीनगर : शहरात किरकोळ कारणावरून गंभीर गुन्हे घडणे सुरूच आहे. मित्राला शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणातून चिकन शॉपवर काम करणाऱ्याने तीन तरुणांवर मांस कापायच्या सुऱ्याने सपासप वार केले. डोके, छातीत सुरा खुपसला गेल्याने नितीन सोनाजी संकपाळ (३५ वर्ष), रा. राजनगर, मुकुंदवाडी या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ व मित्र दत्ता बालाजी जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले. 19 जून रोजी रात्री ८ वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या पुढे चिकन शॉपसमोर ही घटना घडली.

नितीनचा सख्खा मोठा भाऊ असलेला सचिन काही दिवसांपूर्वी पुण्याहून शहरात आला होता. दोघांनी मुकुंदवाडी परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचे ठरवले. जेवण करून बाहेर आले असता तेथे त्यांची दत्तासोबत भेट झाली. तिघे गप्पा मारत असताना त्यांचा कुरेशीच्या दुकानात काम करणाऱ्या मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (२५ वर्ष) याचा मित्र समीर शेख (रा.मिसारवाडी) सोबत वाद झाला. शेखने शिवीगाळ करीत तिघांना धक्काबुक्की केली. नन्नाने अचानक वादात उडी घेत तिघांना शिवीगाळ करून खुनाची धमकी दिली. वाद वाढताच नन्नाने दुकानात जात सुरा आणून तिघांवरही हल्ला चढवला.
या घटनेनंतर घटनास्थळावरुन फरार झालेल्या मस्तान कुरेशी उर्फ नन्ना हा साई टेकडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबियांना भेटून मोबाईल बंद करुन पळून जाण्याचा प्रयत्नात असतांना सहायक निरीक्षक भारत पाचोळे, पोलिस अंमलदार संजय नंद, हैदर शेख, प्रकाश सोनवणे, परशुराम सोनवणे, संतोष गायकवाड यांनी त्याला उचलले. नन्नावर यापूर्वी मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. समीरला रात्री मिसारवाडीतून ताब्यात घेण्यात आले.
इलेक्ट्रिशियन समीर नन्नाचा मित्र आहे. वादापूर्वी तोही हॉटेलमध्ये होता. हॉटेलमागे लघुशंका करताना समीरचे तिघांपैकी एकासोबत वाद झाला होता.