Bus-truck accident : नाशिक आगाराची लोणार- नाशिक बस क्र. (एमएच-14- बीटी- 5066) आणि ट्रक क्र. (एमएच- 21- एक्स- 3321) या दोन वाहनांचा आज रविवार 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जालना शहराजवळील नाव्हा चौफुली परिसरात भीषण अपघात झाला.
जालना : नाशिक आगाराची लोणार- नाशिक बस क्र. (एमएच-14- बीटी- 5066) आणि ट्रक क्र. (एमएच- 21- एक्स- 3321) या दोन वाहनांचा आज रविवार 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जालना शहराजवळील नाव्हा चौफुली परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसमधील सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. नाशिक आगाराची ही बस रोज रात्री 10 वाजेच्या सुमारास लोणारला पोहोचते आणि पुन्हा तीच दुसऱ्या दिवशी पहाटे नाशिककडे निघते. परंतु काल ही बस नादुरुस्त झाल्यामुळे सिंदखेडराजावरून लोणारला गेलीच नाही. सिंदखेडराजा येथेच या बसने मुक्काम केला आणि सकाळी सात वाजेच्या सुमारास सिंदखेडराजावरून पुन्हा नाशिककडे परतीच्या प्रवासाला निघाली. दरम्यान या प्रवासामध्ये नाव्हा चौफुलीवरून कन्हैया नगर मार्गे जालना बस स्थानकाकडे येत असताना वनविभागाच्या रस्त्यावर या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला.