तळणी : मंठा तालुक्यातील तळणी गावात मंगळवार, 27 मे रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील ओढ्याला अचानक पूर आला. या पुराच्या पाण्यातून ओढा ओलांडत असताना एक तरुण वाहून जात होता. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे त्याचा जीव वाचला.

श्रीकृष्णा खंदारे / तळणी : मंठा तालुक्यातील तळणी गावात मंगळवार, 27 मे रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील ओढ्याला अचानक पूर आला. या पुराच्या पाण्यातून ओढा ओलांडत असताना एक तरुण वाहून जात होता. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे त्याचा जीव वाचला.

भारत परिहार असे या तरुणाचे नाव असून तो ओढा पार करताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात सापडला. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी मोठा दोर टाकून परिहार याला वेळीच बाहेर काढले. या प्रसंगी काही वेळ मोठा गोंधळ उडाला होता. मात्र गावकऱ्यांनी धैर्य दाखवत ही कृती यशस्वी केली. या घटनेनंतर प्रशासनाने ओढ्याजवळील रहदारीसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पावसाच्या दिवसात नदीनाल्यांमध्ये पुराच्या पाण्यातून ओलांडण्याचे प्रयत्न टाळावेत, असे आवर्जून सांगितले जात आहे.