जालना : खरीप हंगामाच्या तोंडावर जालना जिल्ह्यात अवैध, बोगस आणि अप्रमाणित खतांचा काळाबाजार सुरू झाला आहे. उत्पादनाची कोणतीही परवानगी नसलेल्या फॉस्फोजिप्सम पावडर नावाचा तब्बल 20 लाख रुपयांचा 320 मॅट्रिक टन खताचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. बुधवार, 28 मे रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जालना – राजूर रोडवरील गुंडेवाडी शिवारातील कृष्णा फास्केम लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये हे अप्रमाणित खत साठवून ठेवले होते. जालना जिल्ह्यात उत्पादनास परवानगी नसलेले व कंपनीच्या परवाण्यात समावेश नसलेले हे रासायनिक खत रेल्वे रॅकद्वारे वाहतूक करून कृष्णा फास्केम लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये साठवल्याप्रकरणी कंपनीवर कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत फॉस्फोजिप्सम पावडर नावाचे तब्बल 20 लाख रुपये किमतीचे 320 मॅट्रिक टन खत कृषी विभागाने जप्त केले आहे. याप्रकरणी जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी गुण नियंत्रण आशिष काळुशे, मोहीम अधिकारी निलेश कुमार भदाणे, जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी विशाल गायकवाड यांच्या पथकाने केली.