यवतमाळ : शिक्षक शंतनू देशमुख यांच्या हत्येने यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, अद्यापपर्यंत मारेकऱ्याचा शोध लागला नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे, या प्रकरणाचा सखोल तपास करित मुख्य सूत्रधाराला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यवतमाळ शहरातील सहकार भवन येथे 29 मे रोजी दुपारी सामाजिक व शैक्षणिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये, शिक्षक शंतनू देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त करण्यात आला. शंतनू देशमुख यांचा खुन झाल्याने शिक्षणक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. शंतनू देशमुख हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अरविंद देशमुख यांचे सुपुत्र होते. बैठकीत विविध संघटणेचे पदाधिकारी उपस्थित होते.मृतक शिक्षक शंतनू अरविंद देशमुख, डॉ. गायत्री सतीश काळे व समीक्षा गौतम आहाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शंतनू देशमुख यांच्या खुनामागे मुख्य सूत्रधार कोण? याची माहिती अद्यापर्यंत प्राप्त न झाल्याने पोलीस प्रशासनाने तपासाची गती वाढवावी, या हत्याकांडा मागे अटक केलेल्या आरोपी व्यतिरिक्त अजूनही आरोपी मास्टरमाईंड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.