dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चोरट्यांनी फोडली एजन्सी ; साडेतीन लाखांचे तेलाचे डबे लंपास!

बुलढाणा :  शहरातील  क्लब लेआउट परिसरातील दर्डा एजन्सी फोडून साडेतीन  लाख रुपयांचे 225 तेलाचे डबे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. 

बुलढाणा :  शहरातील  क्लब लेआउट परिसरातील दर्डा एजन्सी फोडून साडेतीन  लाख रुपयांचे 225 तेलाचे डबे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. 

शहरातील कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये काल दुपारी दीड वाजेच्या दरम्यान माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेला व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगारांनी प्रयत्न केला होता मात्र तो फसला. दरम्यान रात्रीच्या वेळेस क्लब लेआउट येथील दर्डा एजन्सी अज्ञात चोरट्यांनी फोडली.अवघ्या 17 मिनिटाच्या आत चोरट्यांनी एजन्सी मधील तेलाचे डबे आणि कॅन असा एकूण 3.50 लाखांचा मुद्देमाल एका विना नंबरच्या बोलेरो वाहनातून लंपास केला आहे.सोमवार असल्याने एजन्सी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असते परंतु माल येत असल्याने रात्री सात वाजेपर्यंत एजन्सी सुरू होती. त्यानंतर एजन्सी बंद करण्यात आली, दरम्यान रात्री चोरट्यांनी मुद्देमालावर हात साफ केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

नव्या एसपींसमोर चोरट्यांचे आव्हान 

दुपारी चोरीचा प्रयत्न व सायंकाळी प्रत्यक्ष घटना घडल्याने  आता नवनियुक्त एसपी निलेश तांबे यांच्यासमोर चोरींच्या घटनांचे कडवे आव्हान उभे झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top