छत्रपती संभाजीनगर येथे उद्योगपती लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर 

छत्रपती संभाजीनगर :  एमआयडीसी वाळूज परिसरातील उद्योगपती लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा घालून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास एक कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर पोलिसांनी केले. एन्काऊंटरची ही घटना मंगळवारी, २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी परिसरातील साजापूर येथे घडली. दरम्यान अमोल बाबुराव खोतकर यांच्या चार ते पाच साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बाबुराव खोतकर, रा. साजापूर, वडगाव कोल्हाटी परिसर असे एन्काऊंटर मध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. बजाज नगर येथील उद्योगपती लड्डा यांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा मुख्य असलेला अमोल खोतकर हा वडगाव कोल्हाटी परिसरातील साजापूर येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  पोलिसांचे एक पथक मंगळवारी पहाटेच्या सुमारास अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी साजापूर येथे गेले होते. पोलीस आल्याची चाहूल लागतात अमोल खोतकर यांने आपल्या चार चाकी वाहनाने पळून जाण्याचा प्रयत्न करीत पोलिसांवर गोळीबार सुरू केला.   त्यावेळी पोलिसांनी त्याला रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर हा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »