जालना : शहरातील मोती तलावमध्ये बुडून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 26 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. असेफ सय्यद (19 ), आयान आसिफ सय्यद (15 ) रा. शेर सवारनगर जुना जालना असे मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या दोघा भावंडांचा तब्बल अडीच तास शोध घेण्यात आल्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले.

शहरातील मोती तलाव परिसरात ही दोन्ही भावंडे स्कुटीवर आपल्या नातेवाईकांसोबत आले होते. हे भावंडे पाण्यामध्ये उतरले आणि दोघेही पाण्यात बुडाले. बराच वेळ झाल्यानंतरही ते पाण्यातून बाहेर आले नाही. त्यानंतर पाण्यात त्यांची शोध मोहीम सुरू झाली. जवळपास अडीच तास त्यांचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
बुडालेल्या दोन्ही भावंडाच्या घरी त्यांच्या बहिणीचे चार दिवसानंतर लग्न होते. त्यांच्या घरी लग्नाची घाईगडबड सुरू असताना दोन्ही मुले तलावाकडे आले होते. यावेळी नागरिकांनी मोतीतलाव परिसरात एकच गर्दी केली.