dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गावठी पिस्टल घेवून फिरणारा गजाआड; दोन जीवंत काडतूसे पोलिसांनी केली जप्त

छत्रपती संभाजीनगर :  गावठी बनावटीचे पिस्टल घेवून फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई 23 मे रोजी लासूरस्टेशन ते गंगापूर रोडवरील तांदुळवाडी शिवारात करण्यात आली. अमोल रावसाहेब विरनोर (27 वर्षे), रा. मांजरी, ता. नेवासा, जि. आहिल्यानगर असे गावठी पिस्टल घेवून फिरणाऱ्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून पिस्टलसह दोन जीवंत काडतूसे जप्त करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हेशाखेचे सहाय्यक निरीक्षक पवन इंगळे, उपनिरीक्षक दिपक पारधे, पोलिस अंमलदार नामदेव सिरसाट, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, संजय तांदळे आदींचे पथक लासूरस्टेशन परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना एक जण तांदुळवाडी शिवारात गावठी पिस्टल घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी लासूरस्टेशन ते गंगापूर रोडवरील तांदुळवाडी शिवारात सापळा रचून अमोल विरनोर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचे मॅग्झीन असलेले पिस्टल आणि दोन जीवंत काडतूसे असा एकूण 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी अमोल विरनोर याच्याविरुध्द शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top