dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वैष्णवी  हगवणे मृत्यू प्रकरण ; चाकणकर यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह! पत्राची गंभीर दखल आयोगाने का घेतली नाही?

पुणे : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी पुणे पोलिस आणि राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. यासंबंधी वैष्णवी हगवणे यांची मोठी जाऊ मयुरी हगवणे यांच्या पत्रावर राज्य महिला आयोगाने 24 तासात कारवाई करत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. असा दावा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.

रूपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगाने तात्काळ त्सुमोटो याचिका दाखल करुन घेतली असल्याचा दावा केला आहे. तसेच मयुरी हगवणे यांच्या आई आणि भावाने दिलेल्या सहा नोव्हेंबरच्या पत्रावर सात नोव्हेंबरलाच महिला आयोगाने बावधन पोलिस ठाण्याला पत्र पाठवून कठोर कारवाईचे निर्देश दिले असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रकरणात त्याच दिवशी मयुरी हगवणे यांची नणंद करिष्मा हगवणे यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्यामुळे क्रॉस कम्प्लेंट दाखल झाल्याने दोन्ही प्रकरणाचा तपास बावधन पोलिस ठाण्याकडे पाठवण्यात आला असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.

घटना सीसी कॅमेरामध्ये कैद

पत्रात नमूद करण्यात आल्या नुसार 6 नोव्हेंबर  पती घरी नसताना सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिचे कपडे फाडले, दिराने मारहाण केली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही  घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असल्याचा दावा पत्रामध्ये केला आहे.

महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर सवाल!

मात्र, या सर्व प्रकरणात रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातेय. कालही काही सामाजिक संघटनांनी चाकणकर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. आता मयुरी यांच्या आईने लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल आयोगाने का घेतली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top