dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

” कमवा, शिका ” च्या मनसे विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ देणार नाही…

    मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपीन नाईक यांचा इशारा

बजाज ऑटो कंपनीमध्ये विद्यार्थी प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) म्हणून कार्यरत असलेल्या हजारो युवक-युवतींच्या विविध मागण्या व समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी बजाज ऑटो लिमिटेड कंपनी येथे आंदोलन केले. यावेळी ” मनसे विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ देणार नाही…असा इशारा जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपीन नाईक यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर : ” कमवा आणि शिका ” या संकल्पनेच्या नावाखाली टीमलीज फाउंडेशन मार्फत बजाज ऑटो कंपनीमध्ये विद्यार्थी प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) म्हणून कार्यरत असलेल्या हजारो युवक-युवतींच्या विविध मागण्या व समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी बजाज ऑटो लिमिटेड कंपनी येथे आंदोलन केले. यावेळी ” मनसे विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ देणार नाही…असा इशारा जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपीन नाईक यांनी दिला.

टीमलीज कंपनीमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून युवक-युवतींना बजाज ऑटोमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामाची संधी देण्यात आली आहे. मात्र, डिग्री न मिळणे, अल्प मानधनावर कामगारांप्रमाणे काम करून घेणे, मानधनात वाढ न करणे तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भवितव्याबाबत स्पष्टता नसणे, अशा विविध समस्या प्रशिक्षणार्थींनी मनसेसमोर मांडल्या आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून मनसे पदाधिकारी राजू घोरपडे हे संबंधित युवक-युवतींच्या सातत्याने संपर्कात असून, त्यांच्या समस्या मनसे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान बाळा नांदगावकर साहेबांनी प्रशिक्षणार्थी युवक-युवतींच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार आज मनसेच्या वतीने हजारो विद्यार्थी प्रशिक्षणार्थी युवक-युवतींसह बजाज ऑटो कंपनी येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मनसे पदाधिकारी, टीमलीज कंपनीचे प्रतिनिधी, बजाज ऑटो कंपनीचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. बैठकीत युवक-युवतींच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर टीमलीज कंपनीने झालेल्या चर्चेसंदर्भातील लेखी पत्र मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, युवक-युवतींच्या प्रश्नांवर सकारात्मक व त्यांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी बजाज ऑटो कंपनीचे सर्वेसर्वा राजीव बजाज हे येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे यांनी बैठकीदरम्यान फोनवरून दिली.

                मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी

“हा प्रश्न हजारो युवक-युवतींच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर योग्य तोडगा निघेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. युवकांच्या भवितव्याशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपीन शंकरसिंग नाईक यांनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती

या आंदोलनाचे नियोजन मनसे पदाधिकारी राजू घोरपडे, विद्यार्थी प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी गणेश कावळे यांनी केले.
मनविसेचे राज्य सरचिटणीस राजीव जावळीकर, राज्य उपाध्यक्ष मंगेश साळवे, जिल्हा सचिव रोहित ठेंगे, जिल्हा उपाध्यक्ष आदींची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top