नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला. पक्षाने म्हटले की, त्यांनी राजीनामा दिला नाही तर देशभर आंदोलन केल्यानंतर दिल्लीमध्ये निदर्शने केले जातील.

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला. पक्षाने म्हटले की, त्यांनी राजीनामा दिला नाही तर देशभर आंदोलन केल्यानंतर दिल्लीमध्ये निदर्शने केले जातील.
पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एसआयआरवरून निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमध्ये मतभेद असल्याच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले, ज्ञानेश कुमार हे या देशातील सर्वात मोठे देशद्रोही आहेत. ते सर्वात मोठे राष्ट्रविरोधी आहेत. दीपके यांनी आरोप केला की, एसआयआरच्या माध्यमातून देशातील १३ कोटींहून अधिक मते हटवण्यात आली आहेत. त्यांनी म्हटले की, लोकांकडून मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. दीपके म्हणाले, लोकशाहीचा अर्थ असा आहे की जनतेने सरकार निवडावे; मात्र ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यानंतर कोण मतदान करणार आणि कोण करणार नाही, हे सरकार ठरवत आहे.
सीजेपीच्या तीन प्रमुख मागण्या
1) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात चौकशी करण्यात यावी. कोणाच्या निर्देशानुसार निर्णय घेतले गेले, याचीही चौकशी करण्याची मागणी दीपके यांनी केली.
2) आगामी सर्व निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देऊन जानेवारी 2024 मधील मतदार यादी पुनर्स्थापित करावी आणि एसआयआर प्रक्रिया थांबवावी. एसआयआरशी संबंधित कागदपत्रे आणि फाइल्स सुरक्षित ठेवण्याची मागणीही सीजेपीने केली आहे.
3) निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या 2023च्या कायद्यात बदल करून नव्या कायद्यात नागरी समाजाच्या सहभागाची तरतूद करण्यात यावी.


