Tukaram Bidkar dies in an accident: माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघातात निधन

Tukaram Bidkar dies in an accident

Tukaram Bidkar dies in an accident :  अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात तुकाराम बिरकडयांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Tukaram Bidkar dies in an accident

अकोला: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात तुकाराम बिरकडयांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला पाच ही जिल्ह्यातील सुमारे ८०० कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते. माजी आमदार तुकाराम बिरकडहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर मोटारसायकलवर परत येत जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने मोटरसायकलला जबर धडक दिली. या धडकेत तुकाराम बिरकडयांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांचा सुद्धा मृत्यू झाला.

नेमके काय घडले ?

प्राप्त माहितीनुसार, धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करीत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करीत होते. तेव्हा या वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »