Eighth Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शनर्सच्या भत्त्यात सुधारणा करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार असून, यासंदर्भात 2026 पासून शिफारशी लागू होतील.
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शनर्सच्या भत्त्यात सुधारणा करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ही घोषणा केली. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार असून, यासंदर्भात 2026 पासून शिफारशी लागू होतील.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प काही दिवसांतच मांडला जाणार आहे. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 16 जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र हा आयोग नेमका कधी स्थापन होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल, अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली.