Akola Assembly Election 2024: बंडोबा झाले थंड ; डॅा. जिशान हुसेन, मदन भरगड यांची माघार

Akola Assembly Election 2024:

Akola Assembly Election 2024: विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघात वाढत्या बंडाळीमुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, शेवटच्या क्षणी डॅा. जिशान हुसेन, मदन भगरड आणि नाकीर खान यांनी माघार घेतल्याने काँग्रेसला हे बंड शमविण्यात मोठे यश आल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या या खेळीने अकोला पश्चिममध्ये वंचितला मोठा धक्का बसला, तर भाजपाच्या गोटात ताण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

Akola Assembly Election 2024:

प्रवीण खेते / अकोला :  विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघात वाढत्या बंडाळीमुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, शेवटच्या क्षणी डॅा. जिशान हुसेन, मदन भगरड आणि नाकीर खान यांनी माघार घेतल्याने काँग्रेसला हे बंड शमविण्यात मोठे यश आल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या या खेळीने अकोला पश्चिममध्ये वंचितला मोठा धक्का बसला, तर भाजपाच्या गोटात ताण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. अंतिम टप्प्यात झालेल्या बदललेल्या समि‍करणामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत अकोला पश्चिमची निवडणूक गाजणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत ११४ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी बंडोबांना शमविन्याचा प्रयत्न केला. अशातच डॅा. जिशान हुसेन यांनी माघारी घेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का दिला. तर काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड आणि नाकीर खान यांनीही निवडणूकीतून माघार घेतली. त्यामुळे अकोला पश्चिम मतदार संघात वंचितसह भाजपाला मोठा धक्का बसला. भाजपाच्या नाराज उमेदवारांनी माघार न घेतल्याने भाजपाला मतविभाजनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अकोला पश्चिमचे समिकरण बदलले
भाजपाचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला पश्चिम मतदारसंघात उमदेवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, भाजपाने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिल्याने नाराज उमेदवार हरिष आलिमचंदानी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तर डॅा. ओळंबे यांनी जनशक्ती पक्षात प्रवेश करत अर्ज दाखल केला. दुसरीकडे काँग्रेसने साजिद खान पठान यांना उमेदवारी देताच नाराज झालेले मदन भरगड यांनी अपक्ष, तर डॅा. जिशान हुसेन यांनी वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अंतिम क्षणी मदन भरगड आणि डॅा. जिशान हुसेन यांनी उमेदवार्ज मागे घेतल्याने अकोला पश्चिम मतदार संघातील समिकरण बदलल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »