अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील अंबड – भालगाव रोडवर एका पुलाखाली चारही पंजे तोडलेल्या एक नर बिबटया सडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती कळताच बिबटया बघण्यासाठी अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील अंबड – भालगाव रोडवर एका पुलाखाली चारही पंजे तोडलेल्या एक नर बिबटया सडलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती कळताच बिबटया बघण्यासाठी अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी एका गुराख्याला हा मृतावस्थेतील बिबट्या आढळला.

अंबड – भालगाव रोडवर शंकर राजाराम भोजने यांच्या गट नं. १२१ च्या शेताजवळ पुलाखाली एक बिबट्या सडलेल्या अवस्थेत गुराख्याला दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यास कळवली. वनपरीक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड
यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा तसेच पोस्टमार्टेम करून बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. बिबटया मारल्याची माहिती शहर व परिसरात पोहचल्याने लोकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बिबट्या मारून आणून टाकला
या बिबट्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी हा अडीच – तीन वर्ष वयाचा तरुणपणातील नर बिबट्या असून त्याचे शरीर सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याला काही दिवसापूर्वी मारलेले असावे. तसेच तो कोणीतरी मारून या ठिकाणी आणून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त केला. या बिबट्याचे चार पंजे कापलेले आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.