dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वादळी पावसाचा ढील्लीला तडाखा; डीपी कोसळली, केळी बागांचे नुकसान

वाशिम: तालुक्यातील ढील्ली येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावात मोठे नुकसान झाले असून वीज वितरण व्यवस्थेलाही फटका बसला आहे.

वाशिम: तालुक्यातील ढील्ली येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावात मोठे नुकसान झाले असून वीज वितरण व्यवस्थेलाही फटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक डीपी कोसळली असून काही वीज खांबही उखडून पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच अनेक घरांवरील व कोठारांवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, ढील्ली परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी केळीची झाडे कोलमडून पडल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top