dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरून युवकावर हल्ला; एक गंभीर, चार जखमी

वाशिम : मोटारसायकलला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील परिसरात झालेल्या या घटनेत एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असून एक जण गंभीर तर चार जण जखमी झाले आहेत.

वाशिम : मोटारसायकलला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील परिसरात झालेल्या या घटनेत एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असून एक जण गंभीर तर चार जण जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, प्रतिक राजेश राऊत हे सोमवारी दुपारी आई व लहान मुलासह मोटारसायकलने जात असताना एका गॅरेजसमोर कट मारल्याच्या कारणावरून त्यांचा गॅरेज मालकाशी वाद झाला. यावेळी झालेल्या झटापटीत प्रतिक यांच्या आई लक्ष्मीबाई राऊत यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

यानंतर प्रतिक राऊत, प्रवीण राऊत, अंकुश सोनटक्के व सुरज जोगदंड यांनी संबंधित गॅरेजवर जाऊन जाब विचारला असता तेथे उपस्थित असलेल्या १० ते १२ जणांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड व इतर साहित्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात प्रतिक राऊत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते गंभीर जखमी आहेत. तसेच प्रवीण राऊत, अंकुश सोनटक्के, सुरज जोगदंड आणि राजेश राऊत हेही जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी  व कर्मचारी घटनास्थळी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top