बुलढाणा : जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चाललेली असून, आधीच जळगाव जामोद येथील कथित हत्याकांड प्रकरणावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर लक्ष केले जात आहे. दरम्यान, बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी “बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या बाहेरहून गांजा, पिस्तूल आणि विविध अमली पदार्थ येत असून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा करत याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.

मागील काही दिवसांपासून धड विरहित शीर, अर्धवट जळालेला मृतदेह प्रकरणावरून विविध ट्विस्ट समोर येत आहेत. कथित मृतक तरुणी पोलीस स्टेशनला हजर झाल्याने वडील आणि भावाने बहिणीच्या हत्येच्या बनाव केल्याचे समोर आलेले आहे. यामुळे पोलिसांना पुन्हा, तपास चक्रे फिरवावे लागत आहे. या प्रकरणात काही पोलिस कर्मचाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहेत. याच सगळ्या प्रकरणावरून, आता आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी दोन दिवसांपूर्वी एसपींना फोन करून लक्षात आणून दिले की, बुलढाणा जिल्ह्यात परराज्यातून पिस्तूल, गांजा मोठ्या प्रमाणात येत असून अवैध धंदे वाढले आहेत. मात्र याकडे पोलिसांची दुर्लक्ष होत आहे. मागे मी टीका केली होती, तर मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला होता. शहरातही अनेक गाड्या चोरीला जातात, परंतु पूर्णपणे नोंदही होत नसल्याचे त्यांनी सांगितले.