dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

१५ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्याला  पकडले 

अंबड :  एका तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या मोकळ्या जागेची नोंद घेवून नमुना ८- अ चे प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुक्कडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विष्णू भानुशे याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई शनिवार, 31 मे रोजी सायंकाळी उशिरा करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू शामराव भानुशे हे अंबड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुक्कडगाव येथे ग्रामविकास अधिकारी असून एका व्यक्तीस त्याच्या आईच्या नावे असलेल्या मोकळ्या जागेची नोंद घेवून नमुना ८-अ चे प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी विष्णू भानुशे यांना नमुना ८-अ चे प्रमाणपत्र मागितले असता भानुशे यांनी त्यासाठी संबंधित तक्रारदारास गुरुवार, 29 मे रोजी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. भानुशे याने त्याच्या अंबड शहारातील शारदा नगरातील राहत्या घरी लाचेची रक्कम स्वीकारली त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेण्यात आली असून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 

 ही कारवाई सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे, पोलिस अंमलदार श्रीनिवास गुडुर, मनोहर भुतेकर, शिवलिंग खुळे, गणेश चेके, अमोल चेके, विठ्ठल कापसे यांनी ही कारवाई केली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top