जाफराबाद : तालुक्यातील कोनड शिवारातील एका शेततळ्यात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 3 जून रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाफराबाद : तालुक्यातील कोनड शिवारातील एका शेततळ्यात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 3 जून रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील जोशी कुटुंब सोमवार, 2 जून रोजी डोलखेडा येथील ओलांडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेले होते. यावेळी कुटुंबातील यश अनिल जोशी ( 14 ), दिपाली रमण जोशी ( 9 ), रोहण रमण जोशी ( 7 ) ही तीन भावंडे बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊनही ही भावंडे सापडली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी जाफराबाद पोलिसात तक्रार दिली होती .

दरम्यान, मंगळवारी सकाळी कोनड शिवारातील सुभाष परिहार यांच्या शेतातील शेततळ्यात या तिन्ही भावंडाचे मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक शेतकर्यांना आढळून आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ही तिन्ही भावंडे या शेततळ्यावर कशी गेली, त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. जाफराबाद पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.