चिखली – मेहकर रोडवर ट्रक, कार आणि दुचाकीचा तिहेरी अपघात; तिघांचा मृत्यू!

चिखली : ट्रक, कार आणि दुचाकीची तिहेरी धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चिखली – मेहकर रोडवरील खैरव फाट्यानजीक बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.  

चिखली : ट्रक, कार आणि दुचाकीची तिहेरी धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चिखली – मेहकर रोडवरील खैरव फाट्यानजीक बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.  

   सर्वप्रथम भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेतील डस्टर कंपनीच्या कारला धडक दिली. याचवेळी या दोन्ही वाहनांमध्ये रस्त्यावरील एक दुचाकी अनियंत्रित होवून धडकली. ही धडक इतकी जबर होती की, कार व दुचाकीचा समोरील भाग अक्षरश: चकनाचूर झाला होता. अपघातामुळे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्या साचल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

दुचाकीस्वार पतीपत्नी आणि मुलगा ठार  

दुचाकीवरील बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील गणेश यादव गायकवाड (४५वर्ष) हे,  त्यांच्या पत्नी आणि मुलासह ठार झाले. पत्नी लक्ष्मी गणेश गायकवाड (वय ४०), मुलगा कृष्णा गणेश गायकवाड (वय १५) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गणेश गायकवाड हे गंभीर अवस्थेत होते, त्यांना चिखली येथील डॉ. जवंजाळ हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात वाढले 

जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचे भीषण चित्र आहे. अनेकदा भरधाव वेग अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याने ‘आवरा वेगाला, सावरा जीवाला’ असे म्हणावे लागत आहे. मे महिन्यात देखील अनेक अपघातांच्या घटना घडल्या. दरम्यान, बुधवारी दुपारी खैरव फाट्यावरील झालेला अपघात गत दोन महिन्यातील भयंकर आणि मोठा अपघात ठरला आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »