dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Sant Gajanan Maharaj palakhi  : टाळ-मृदुंगच्या गजरात श्रींच्या पालखीचे राजराजेश्वरनगरीत आगमण

Sant Gajanan Maharaj palakhi  :  टाळ – मृदुंगाच्या गजरात बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास संत श्री गजानन महाराजांची पालखी डाबकी रोडमार्गे श्री राजराजेश्वर नगरीत दाखल झाली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून अकोलेकरांनी पालखीचे स्वागत केले. चौकाचौकात आकर्षक देखाव्यांसह भक्तीगितांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Sant Gajanan Maharaj palakhi 

अकोला :  टाळ – मृदुंगाच्या गजरात बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास संत श्री गजानन महाराजांची पालखी डाबकी रोडमार्गे श्री राजराजेश्वर नगरीत दाखल झाली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून अकोलेकरांनी पालखीचे स्वागत केले. चौकाचौकात आकर्षक देखाव्यांसह भक्तीगितांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.
विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांच्या पंढरपूर येथे निघालेल्या पालखीचे भजनी, दिंडी, अश्व व ७०० वारकऱ्यांसह श्री राजराजेश्वरनगरात आगमन झाले. डाबकी रोड मार्गे ही पालखीने शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय परिसरात काही काळ विश्राम घेतला. यावेळी जुने शहरातील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गत ४८ वर्षांपासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. येथून प्रस्थानानंतर पालखी सायंकाळी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाली. येथे पालखी रात्रीचा मुक्काम करणार असून गुरुवारी पालखी पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे.

या मार्गावर पालखीचे स्वागत
शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथे येथून मार्गस्थ झाल्यानंतर पालखी डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल रुक्माई मंदिर, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, चिव चिव बाजार येथून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात पोहोचली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top