IPL 2025: आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले होते. पण हे आव्हान गाठताना पंजाबने टप्प्याटप्प्याने विकेट गमावल्या. तसेच पंजाब किंग्सचं पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं. आरसीबीने यापूर्वी तीनदा अंतिम फेरी गाठली होती.
अहमदाबाद : आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा धुव्वा उडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले होते. पण हे आव्हान गाठताना पंजाबने टप्प्याटप्प्याने विकेट गमावल्या. तसेच पंजाब किंग्सचं पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं. आरसीबीने यापूर्वी तीनदा अंतिम फेरी गाठली होती. तिन्ही वेळेस अपयश आलं होतं. पण चौथ्यांदा विजय मिळवण्यात यश आले.
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आणि 74 मॅचनंतर अखेर आयपीएल 2025 ला विजेता मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा फायनल सामना झाला. दोन्ही टीमनं यापूर्वी एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावले नव्हते. त्यामुळे ही फायनल दोन्ही टीमसाठी खास होती. त्यामध्ये अखेर आरसीबी यशस्वी ठरली आहे. आरसीबीनं पंजाबचा रन्सनं पराभव करत विजेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण केलं. आरसीबीनं पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत विजेतेपद मिळवलं.