बुलढाणा : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे थैमान पहायला मिळत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथे झालेल्या हाहाकारानंतर मंगळवारी सकाळपासूनच सर्वत्र पावसाचा कहर दिसून आला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत.

जिल्ह्यात सोमवार, 15 सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. देऊळगांव राजा तालुक्यात असलेला व जिल्ह्यातील सर्वात मोठा ‘संत चोखा सागर’ अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात 46 हजार 854 घन फूट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे 20 सेंटिमीटरने मंगळवारी सकाळी उघडण्यात आले आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त केला जाऊ शकतो, या दोन्ही नद्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
विजेचे तांडव..
पवसासह वीजांच्या तंडवाने अनेक भागात नुकसान झाले तर खामगाव तालुक्यात जीवित हानी झाल्याचे उघडकीस आले. बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोड परिसरात एका घरावर सोमवारी मध्यरात्री वीज कोसळली. यामध्ये, मोठे नुकसान झाले आहे. त्याआधी खामगाव तालुक्यातील वरवट-शेगाव मार्गावर काथरगाव येथील बसथांब्याजवळ विजेचा धक्का बसून एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. योगेश भानुदास देवकुडे (वय २८, रा. काथरगाव) असे मृतकाचे नाव आहे.