जालना : भुसार मालाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने पैसे बाकी ठेवले म्हणून 80 ते 90 जणांच्या जमावाने व्यापाऱ्याच्या घरावर हल्लाबोल केला. रविवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोबरे येथे हा थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

जालना : भुसार मालाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याने पैसे बाकी ठेवले म्हणून 80 ते 90 जणांच्या जमावाने व्यापाऱ्याच्या घरावर हल्लाबोल केला. रविवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोबरे येथे हा थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवखेडा ठोबरे येथील लंकाबाई सरदार बिलघे यांच्या घरावर शेकडो जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला.
लंकाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या पवन बिलघे याचा केदारखेडा येथे भुसार मालाचा व्यवसाय होता. शेतकऱ्यांचे काही पैसे बाकी राहिल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या तुरुंगात आहे. मात्र या कारणावरून गावातील बाबासाहेब वराडे, पप्पू उर्फ भास्कर ठोबरे यांनी गावातील ३५ जण व इतर ८० ते ९० लोकांना एकत्र करून लंकाबाई यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी घराचे गेट मोडले. खिडक्यांवर दगडफेक केली. कॅमेऱ्यांची तोडफोड केली. लाकडांचे ओंडके घरावर फेकले व घरात घुसून महिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावेळी लंकाबाईंची गरोदर मुलगी उपस्थित होती. तरीदेखील आरोपींनी निर्दयीपणे धमक्या दिल्या,असे फिर्यादीत म्हटले आहे.
भोकरदन पोलिस ठाण्यात दंगल, मारहाण, तोडफोड, जीवे मारण्याची धमकी, सरकारी आदेशाचा भंग आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यांच्यावर गुन्हे दाखल
या प्रकरणी लंकाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाबासाहेब वराडे, पप्पु उर्फ भास्कर ठोबरे, रमेश ठोबरे, उमेश ठोबरे, गणपत ठोबरे, गणपत ठोबरे, नारायण ठोबरे, संजु ठोबरे, रामेश्वर ठोबरे, बाबासाहेब ठोबरे, विजय ठोबरे, परमेश्वर ठोबरे, शरद ठोबरे, संजु ठोबरे, सुभाष ठोबरे, आकाश आढावे, वनिता ठोबरे, राधाबाई ठोबरे, जगदीश ठोबरे, श्रीराम सोरमारे, गंगाधर काळे, भाऊसाहेब घोडे, परमेश्वर ठोबरे, विजय ठोबरे, संजु ठोबरे, रामेश्वर ठोबरे, पांडुरंग पडोळ, डिगांबर वाघ, लक्ष्मीबाई वाघ, पंढरीनाथ तांबडे, गौतम राऊत, गोविंदराव बकाल, श्रीमंता लोखंडे, दत्तात्रय ठोबरे यांच्यासह अन्य ८०-९० लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
