पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आठ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळाचे अध्यक्ष त्रिभुन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे 2 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. विभागीय निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.९६ आहे. तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.५६ टक्के आहे.
दहावीचा विभागनिहाय निकाल
पुणे – ९४.२४ टक्के
नागपूर- ८९.०७ टक्के
संभाजीनगर- ८८.४१ टक्के
मुंबई – ९४.९७ टक्के
कोल्हापूर – ९५.४७ टक्के
अमरावती – ९०.५० टक्के
नाशिक ९०.५३ टक्के
लातूर – ८८.४२ टक्के
कोकण – ९७.६२ टक्के