स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी पर्यंत घ्या; सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला फटकारले

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आयोगाला आलेले अपयश पाहता, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने ही अंतिम संधी देत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

हा निर्णय देताना कोर्टाने नाराजी व्यक्त करत यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही असा इशाराही आयोगा बरोबरच राज्य सरकारलाही दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने 6 मे रोजी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, नगरपरिषदांसाठी प्रभाग पुनर्रचना सुरू आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ती पूर्ण झाली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएमएसची कमी उपलब्धता, बोर्ड परीक्षांमुळे शाळांची अनुपलब्धता आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यांसारखी कारणे देत आयोगाने वेळ मागितला आहे. 

निवडणूक आयोगाला निर्देश

न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र असंतोष व्यक्त करत म्हटले की, या न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे वेळेत पालन करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरला आहे. मार्च 2026 मध्ये बोर्ड परीक्षा असल्या तरी, हे निवडणुका पुढे ढकलण्याचे कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले. निवडणुकांसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची माहिती दोन आठवड्यांत राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करण्याचे निर्देशही आयोगाला देण्यात आले. 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »